सोलापूर : कोरोनाच्या काळात सततच्या लॉकडाऊन मुळे हातावरच पोट असलेल्या कित्येकांचे रोजगार गेले आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.लॉकडाऊन नंतर खऱ्या अर्थाने रोजगाराच्या संधी उपलब्ध होन गरजेचं आहे.त्याचाच एक भाग म्हणून प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून मुलींसाठी आज मोफत शिलाई मशीन ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.या मोफत शिलाई मशीन ट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन सोलापूर च्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
मुलींनी स्वतःच्या पायावर उभा राहून आर्थिक सक्षम होणं गरजेचं आहे.मुलींनी ट्रेनिंग घेऊन पुढे जाऊन स्वतःचा छोटासा व्यावसाय सुरू करावा व आत्मनिर्भर बनावे,करियर करण्यासाठी विविध क्षेत्र आहे,या क्षेत्रात ही करियरच्या संधी आहेत त्या शोधा व तसे स्किल स्वतःमध्ये डेव्हलप करा आणि स्वतःचे आयुष्य घडवा असे मत तेजस्विनी सातपुते यांनी व्यक्त केले.
प्रार्थना फाऊंडेशनचे च्या माध्यमातून समाजातील विविध घटकांवर काम केले जाते.वंचित,निराधार,भिक्षा मागणारी मुल समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावी या साठी प्रयत्न केला जात आहे.याच घटकातील मुलींनी आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावं या साठी मोफत शिलाई मशीन ट्रेनिंग सुरू केले आहे. पुढे जाऊन मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचं मत संस्थेच्या सचिव अनु मोहिते यांनी व्यक्त केले.
शिलाई मशीन ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी space 79 फाऊंडेशन ने प्रार्थना फाऊंडेशन ला चार शिलाई मशीन आणि ट्रेनरचे मानधन देऊन सहकार्य करण्यात आले.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी space 79 फाऊंडेशन चे प्रभाकर जमखंडीकर, शिरीष दंतकाळे,ट्रेनर शर्मिला हुल्ले आदी मान्यवर उपस्थित होते


















