मोहोळ शहरातील डेंगू सदृश्य साथ नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेना नगरसेविका सीमा पाटील यांनी नगर परिषदेकडे केलेल्या केलेल्या मागणीनुसार प्रत्यक्षात फॉगिंग मशीनने क्रांती नगरपासून फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली.
यावेळी नगरसेविका सीमा पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक शिवरत्न गायकवाड, नगरपरिषद आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख श्री अमित लोमटे, दिलीप जाधव, कोंडीबा देशमुख, संतोष माळी, विजय गायकवाड, इत्यादी नंदकुमार आस्तुळ उपस्थित होते या फवारणीमुळे डासांचे प्रमाण कमी होईल . असे नगरसेविका सीमा पाटील यांनी सांगितले व तात्काळ दखल घेतल्याबद्दल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या आभार मानले.

















