सोलापूर : नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या एका कार्यक्रमाला काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे शहराध्यक्ष वाले होते. दोन वर्षांपूर्वी श्रीदेवी फुलारे यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्या सध्या पक्षात सक्रिय नाहीत असे असताना प्रकाश वाले यांनी त्यांच्या कार्यक्रमाला जाणे योग्य नाही असे म्हणून काँग्रेस युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी संताप व्यक्त करत प्रकाश वाले आणि संजय हेमगड्डी यांचा राजीनामा मागितला आहे. करगुळे पहा काय म्हणाले…

















