सोलापूर : काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत, त्यांच्या सातरस्ता परिसरातील जनवात्सल्य निवासस्थानी सकाळी दहा पासून कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत होते सकाळच्या सुमारास जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांनी शिंदे यांची भेट घेतली.
त्यानंतर शहरातील प्रकाश वाले चेतन नरोटे यांच्यासह इतर अनेक नगरसेवकांनी भेट घेतली, मोहोळ तालुक्यातील एका ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा सुशीलकुमार शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. याचवेळी जनवात्सल्य समोर एका प्रांतअधिकाऱ्याची गाडी सुद्धा दिसून आली, नंतर माहिती घेतली असता या प्रांत अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याने त्याने साहेबांची भेट घेतल्याचं समोर आलं.
दरम्यान नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सुशीलकुमार शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतली यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली या चर्चेनंतर धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेस भवनात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी चर्चा केली असता सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीवर विचारले, एका पत्रकाराने तर नव्या पिढीमुळे जुन्याची मने दुखत आहेत असे वाटत नाही का?असा प्रश्न केला तेव्हा, सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या आशीर्वादानेच मला जिल्ह्याचे अध्यक्ष पद मिळाल्याचे सांगतात पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला….
काँग्रेस भवनात झालेल्या बैठका त्यानंतर तालुकानिहाय दौऱ्याच्या नियोजन आणि पुढे सर्व तालुका दौऱ्याचे नियोजन यावर शिंदे साहेबांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. मात्र संपूर्ण तालुका दौरा झाल्यानंतर जिल्ह्याची कार्यकारणी निवडताना जो कार्यकर्ता ग्राउंड लेव्हलला काम करतो त्यांनाच मी पद देणार असे धवलसिंहांनी शिंदे साहेबांच्या कानावर घातले आहे मात्र सर्वांना काढणार असे नाही ज्या त्या पद्धतीने सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, त्या त्या लेव्हलच्या नेत्याचं पद कायम राहील,काँग्रेस पक्ष एवढा मोठा आहे की कुणी कुठेतरी बसून जाईल असे धवलसिंह म्हणाले.
जिल्ह्याच्या परिस्थितीवर बोलताना निश्चितच जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मजबूत करण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. दौऱ्या नंतरच काँग्रेसची ग्रामीण भागातील खरी स्थिती समोर येईल तो पर्यंत काहीही सांगता किंवा अंदाज लावता येणार नाही असे सांगतानाच ग्रामीण यंत्रणा व बूथ यंत्रणा सक्षम झाल्याशिवाय कळसाच्या गप्पा कशा मारता येतील असेही धवलसिंह मोहिते-पाटील एका पत्रकारांच्या प्रश्नावर म्हणाले.


















