सोलापुरात काँग्रेस पक्षाला ग्रामीण मध्ये धवलसिंह मोहिते पाटील सारखा बडा नेता मिळाला त्याच नंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद शुगर कारखान्याचे युवा चेअरमन गणेश माने देशमुख यांनीही नुकताच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धवलसिंह मोहिते-पाटील हे कॉंग्रेसमध्ये आल्याने विशेष करून सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस मजबूत होण्याची संधी आहे .एकूणच जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांची जर चार वर्षातील कारकीर्द पाहिली तर त्यांनी त्या पदाला न्याय दिला नसल्याच स्पष्ट होतंय. लोकसभा निवडणूक असेल की विधानसभा निवडणूक त्यांनी स्वतःच्या गावातच आघाडीच्या उमेदवाराला मतदान दिले नाही हे आकडे सांगतात त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे निश्चितच या भागात काँग्रेसला बळ मिळणार आहे धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसमध्ये प्रवेश करून सुमारे दोन महिने होत आले परंतु ते अजूनही स्थानिक राजकारणात सक्रिय झाले नाहीत काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांची निवड झाली निवडीनंतर आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूरच्या कॉंग्रेस भवनात जंगी असा सत्कार कार्यकर्त्यांनी केला परंतु त्या सत्कार कार्यक्रमाला धवलसिंह मोहिते पाटील दिसले नाहीत सोलापुरात काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून काँग्रेस भवन आहे या कार्यालयातूनच शहर आणि जिल्ह्याचा सर्व कारभार चालतो, जिल्हा आणि शहराध्यक्ष यांची कार्यालय या ठिकाणी आहेत, धवलसिंह मोहिते-पाटील हे काँग्रेसमध्ये आल्यापासून एकदाही कॉंग्रेस भवनात आले नाहीत. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी बोलावलेल्या बैठकीला ते केवळ हजर राहिल्याचे चित्र होतं त्यामुळे धवलदादा पक्षात सक्रिय कधी होणार या प्रतीक्षेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत धवलसिंहांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे.



















