सोलापूर : विमानसेवेसाठी उपोषणास बसलेले सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांना बंदूक सिद्धेश्वर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांचा बंदुकीचा परवाना निलंबित केला आहे.
विमानसेवेला अडथळा ठरणारी कारखान्याची चिमणी काढावी यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीने पूनम गेटसमोर आंदोलन करण्यात येत होते. काही दिवसांपूर्वी दिवसांपूर्वी या आंदोलनस्थळी जाऊन काडादी यांनी शहा यांना बंदूक दाखविली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी काडादी यांना नोटीस बजावली होती.
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका केतन शहा यांनी घेतली होती. पोलिसांनी दोघांनाही नोटीस देत खुलासा मागविला होता. दरम्यान, बंदूक दाखवल्याप्रकरणी काडादी यांनी दिलेले उत्तर हे असमाधानकारक असल्याचे कारण देत त्यांचा बंदुकीचा परवाना मार्चअखेरीपर्यंत निलंबित करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
धर्मराज काडादी यांचा बंदुकीचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नुकतेच काढले. पिस्तूल जमा करण्यात आले आहे.

















