रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, व महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे कट्टर समर्थक साई निकंबे यांचे मंगळवारी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.
पोट दुखीचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कळाली. आंबेडकरी चळवळीतील चांगला कार्यकर्ता कमी वयात गेल्याने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुरूनानक चौक तसेच आंबेडकर नगर भागांमध्ये त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्या पत्नीनी 2017 ची महापालिका निवडणूक एम आय एम या पक्षाकडून लढवली होती. स्वतः साई निकंबे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सोलापूर शहर मध्य विधानसभेचे अध्यक्ष होते रिपाईचे जिल्ह्यातील नेते राजाभाऊ सरवदे यांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर आज मंगळवार रात्री सात वाजता मोदी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

















