Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

धक्कादायक | पंढरपुरात सावकारी जाचातूनच युवकाची आत्महत्या | अनेक खुलासे बाहेर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 January 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर :  शहरातील अनिलनगर येथे संतोष साळुंखे नामक तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी, धक्कादायक खुलासा बाहेर आला असून , ही आत्महत्या सावकारी जाचातूनच झाली असून, या प्रकरणी एका संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.   

अनिलनगर भागात घडलेल्या या घटनेत संतोष प्रकाश साळुंखे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .संतोष याचे वय २६ वर्षाचे होते . अनिल नगर परिसरात म्हसोबा मंदिराच्या जवळ राहणार्‍या संतोष साळुंखे याने छताला साडी बांधून फास घेतला आहे. स्वप्निल टमटम यांनी या घटनेची खबर पंढरपूर शहर पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी या घटनेची नोंद करून, पुढील कार्यवाही सुरू केली होती .सदर आत्महत्या कशासाठी केली, याचे नेमके कारण समोर आले नव्हते, पण पोलीस तपासात व्यस्त होते . सदर आत्महत्या ही सावकारी पाशातून झाल्याची चर्चा सुरू होती . पण ठोस काहीही पुढे येत नव्हते. अखेर याबाबत बरीच माहिती समोर येऊ लागली असून , सावकारी दहशतवादाने संतोषचा बळी गेला असल्याचे निष्पन्न होऊ लागले आहे.

 पंढरपूर शहरात बेकायदा सावकारी आधीपासूनच बोकाळली आहे. पण त्यास वाचा फुटत नाही, आणि प्रकरणे बाहेर येत नाहीत .या घटनेबाबत मात्र आत्महत्या झाल्याने ,आरोपीच्या नावासह फिर्याद देण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या संतोष साळुंखे याला सावकाराने दिलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून, ही आत्महत्येची घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सावकाराने संतोष साळुंखे यांचे घर बळजबरीने लिहून घेतले होते, आणि त्याला मारहाणही करण्यात आली होती ,अशी धक्कादायक माहिती फिर्यादीत समोर आली आहे .मयत संतोष याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या सुसाईड नोटमध्ये संतोष यांनी आरोपींची नावे आणि आत्महत्येचे कारण लिहिले असल्याने आत्महत्येचे बाहेर आले आहे.  

मयत संतोष साळुंखे याचा भाऊ पांडू प्रकाश साळुंखे, यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शेखर दत्तात्रय कुंदुरकर, त्याची बहीण सुवर्णा अंकुश बिडकर, सुवर्णाचा पती अंकुश रामा बिडकर यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार शेखर दत्तात्रय कुंदूरकर यास पोलिसांनी अटक केली आहे. मयत संतोष साळुंखे यांनी आरोपीकडून व्याजाने पैसे घेतले होते . सदरची रक्कम व्याजासह परत करण्यात आली होती. तरीही आरोपीने संतोषकडे जादा व्याजाची मागणी केली, आणि वसुलीसाठी संतोष यास मारहाण करून, घरच्या लोकांना मारून टाकतो अशी धमकी दिली. मयत संतोष साळुंखे यांच्याकडून घराची विक्री केल्याची नोटरी जबरदस्तीने करून घेतली. यामुळे संतोष यास मानसिक तसेच शारीरिक त्रास झाला, यातूनच त्याने आत्महत्या करण्याची घटना घडली अशाप्रकारची फिर्याद देण्यात आली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण सोलापूरच्या भाजपा युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर ; कुणाला मिळाले कोणते पद

Next Post

ब्रेकींग | सोलापुरात संस्था चालकाचे थेट शाळेला कुलूप | पालकांना दाखले घेऊन जाण्याची भाषा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग | सोलापुरात संस्था चालकाचे थेट शाळेला कुलूप | पालकांना दाखले घेऊन जाण्याची भाषा

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971572
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group