दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती या गावांमध्ये रविवारी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी डीपी दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाला. महादेव शिवानंद तोरकडे वय 22 असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मयत तरुणाचे मामा शिवशंकर मेरू यांनी माहिती दिली की, मयत हा गावात लाईट दुरुस्तीचे काम करतो, रविवारी सायंकाळी मुस्ती येथे शेतातील विजेची डीपी दुरुस्ती करण्याचे काम करण्यासाठी वायरमन शिंदे आणि ऑपरेटर गुरव यांनी नेले, तो खांबावर कडून काम करत असताना अचानक लाईट आली आणि विजेचा जोरदार धक्का बसला,आणि तो खाली कोसळला त्याला लगेच उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले मात्र रात्री साडे बाराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हीलमध्ये असून महादेव नको म्हणत होता तरी त्याला नेले ऑपरेटर व वायरमनच्या चूकीमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे, वायरमन व संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका सध्या नातेवाईकांनी घेतली आहे. ग्रामीण भागात लाईटचे काम करणारे असे अनेक युवक आहेत, जीव धोक्यात घालून ते काही रुपयांसाठी काम करतात, अनेकांचे अशा कामात जीव गेल्याचे दिसून आले आहे.अशा घटनांमध्ये खरे तर त्या भागातील वायरमन आपली बरीच कामे ते अशा लोकांकडून करून घेतात त्यामुळे त्यांना सर्वाधिक जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.



















