सोलापूर : महसूल कर्मचान्यांना जुलै अन् ऑगस्ट या दोन महिन्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे अनेकांचे घरभाडे अन् बँकेचे हप्ते थकले असून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना घराचे अर्थचक्र सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आर्थिक नियोजन कोलमडल्याने घरच्या ‘लक्ष्मी’ सोबत अनेकांचे वाद सुरू असल्याची माहिती काही कर्मचारी देत आहेत. राशन, घरभाडे अन् बँकेच्या हप्त्यांसाठी कर्मचारी पतसंस्थेकडे तातडीच्या कर्जासाठी अनेकांची अर्ज केले आहे तसेच वेतनप्रश्नी कर्मचारी संघटना ७ सप्टेंबरपासून आंदोलन करणार आहे. दरम्यान या प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या कडून माहिती घेतली असता शासनाकडून वेतनासाठी येणारे अनुदान कमी प्रमाणात येत असल्याने वेतन होत नाही.
दहा ते पन्नास हजार रूपये तातडीच्या कर्जासाठी शंभराहून अधिकांनी अर्ज केला आहे. वेतन नियमित वेतन मिळत नसल्याने अधिकारी व कर्मचारी त्रस्त आहेत
त्यात नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक, शिपाई असे चौदाशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. वेतनासाठी कर्मचारी संघटना गुरुवार 7 सप्टेंबरपासून प्रशासन विरोधात आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन आंदोलनाची तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात येणार असल्याचे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी सांगितले..