सोलापूर : पंतप्रधान मंत्री नरेंद मोदी यांच्या दिल्ली येथील संकल्प सप्ताह उद्धघाटन सोहळ्याचे प्रक्षेपन सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आभासी पद्धतीने (virtually / online ) आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव प्रमुख उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या निती आयोगामार्फत राबविल्या जात असलेल्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर ‘महत्वकांक्षी तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पंतप्रधान यांच्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबर रोजी भारत मंडप, नवी दिल्ली येथे ‘संकल्प सप्ताह’ कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाकरीता आकांक्षित तालुक्यांकरीता जिल्हा स्तरावरील अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, सांगोला गटविकास अधिकारी आनंद लोकरे व अक्कलकोटचे गटविकास अधिकारी सचिन खाडे हे नवी दिल्ली येथे कार्यक्रमा साठी उपस्थित होते.
राजकारण बाजूला ठेवू, ग्रामविकासासाठी एकत्र येऊ ; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन
……………………….
अक्कलकोट तालुका हा राज्याच्या टेलला असलेला तालुका आहे. बाजूस कर्नाटक राज्य लागते. विकासा पासून दूर राहिलेल्या या तालुक्याची निवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १०० तालुक्यासाठी केली आहे. ग्रामविकास हा लोकसहभागा शिवाय अशक्य आहे. असेही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
प्रास्तविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी केले. विकासांचे माॅडेल निती आयोगाने समोर ठेवले आहे. दोन वर्षात या तालुक्यात चांगले काम करणेसाठी तसे नियोजन करणेत येत आहे. असेही शेळकंदे यांनी सांगितले.
उप मुख्य कार्यकारी अमोल जाधव यांनी गावाचा व तालुक्याचा विकास करताना स्वच्छता हा घटक महत्वपुर्ण आहे. १ आॅक्टोबरला सकाळी १० वाजता १ तास स्वच्छता श्रमदानासाठी द्या असे आवाहन केले. जिल्हा स्तरावर उत्तर पंचायत समिती समोर एक तास स्वच्छता केली जाणार असल्याचे सांगितले.
सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. तर. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अधिक्षक झेड ए शेख, माझी वसुंधरा समन्वयक वैभव आहाळे, जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे, समन्वयक अमोल महिंद्रकर यांनी परिश्रम घेतले.