“सोलापूरात काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या निषेधार्थ सायकल रॅली काढून महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात लक्ष वेधण्यात आले”.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलाचा सह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. या जीवघेण्या महागाई विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तुंच्या महागाई विरोधात सायकल रॅली काढण्यात आली.
शहराध्यक्ष प्रकाश वाले कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक रियाज हुंडेकरी,नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, एनएसयुआय अध्यक्ष गणेश डोंगरे, युवक कार्याध्यक्ष युवराज जाधव, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर कोमारो सय्यद तिरुपती परकीपडला, अंबादास गुत्तीकोंडा, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, गौरव खरात, गटनेता चेतन नरोटे, हाजीमलंग नदाफ, अशोक कलशेट्टी, केशव इंगळे, या रॅलीमध्ये सहभागी होते या रॅलीमध्ये सहभागी होते शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी तर बैलगाडी आणून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..
दरम्यान नगरसेवक रियाज हुंडेकरी, नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले यांनी केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आपली भूमिका स्पष्ट केली.




















