सोलापूर : सोमवारी औरंगाबाद येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी जनाअक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या भव्य मोर्चाची भाजपने मोठी प्रसिद्धी केली. औरंगाबाद महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर भाजपने ताशेरे ओढले.
दरम्यान त्यावर बोलताना सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले यांनी सोलापूर महानगरपालिकेत जिथे गेली ५ वर्षे झाली, तुमच्या भाजपची सत्ता आहे इथे देखील पाण्यासाठी बोंब आहे…कधी तरी यावर एखादा मोर्चा काढा..हे अस झाल आपलं ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून..या शब्दात शहराध्यक्ष वाले यांनी फडणवीसांना चिमटे घेतले.


















