सोलापूर : जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागातील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांच्या पत्नी स्वाती सचिन जाधव यांचे रविवारी पहाटेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.
स्वाती जाधव यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी या गावी रविवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी, पत्रकार तसेच पंढरपूर तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















