सोलापूर : सोलापुरातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बशीर शेख यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सोलापुरातील राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 70 होते, पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे राहते घर पंजाब तालीम या ठिकाणाहून त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी पाच वाजता निघून चिरागअली कब्रस्थान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

















