बोरामणीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव गुरुसिद्धप्पा माशाळे यांचे आज सकाळी दहा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. बाबुराव अण्णा यांनी बोरामणीचे वीस वर्षे सरपंचपद भूषवले आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी वीस वर्षे काम पाहिले.
जिल्हा परिषद सदस्य म्हणून दहा वर्षे काम पाहिले आहे. व जिल्हा नियोजन व विकास महामंडळावर त्यांनी पाच वर्षे पद भूषवले. गेली चार दशके बोरामणीच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. माशाळे यांची अंत्ययात्रा बोरामणी येथील त्यांच्या राहत्या घरापासून सायंकाळी पाच वाजता निघणार आहे.

















