सोलापूर – दमानी नगर येथील गडदर्शन सोसायटीमधील रहिवाशी श्रीमती अंजनाबाई काशिनाथ भोईटे ( वय ८५ ) यांचे शुक्रवार ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार सकाळी आठ वाजता गडदर्शन सोसायटीमधील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार असून त्यांच्या पार्थिवावर कोयना नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे फौजदार चावडीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश भोईटे यांच्या त्या मातुश्री होत.



















