सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते नरेश गुरुनाथ साखरे यांचे शनिवार दि.29 रोजी पहाटे 3.30 वाजता पुणे हॉस्पिटलमध्ये निधन झाले,ते 56 वर्षांचे होते,त्यांच्या मागे पत्नी व हर नर्मदाच्या प्रमुख कार्यकर्त्या रंजना, दोन मुले व सून असा परिवार आहे, नरेश साखरे यांची अंत्ययात्रा दुपारी 5 वाजता जुळे सोलापुरातील शिवगंगा नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे, त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
साखरे यांना मित्रांनी वाहिलेली ही श्रद्धांजली
“साखरे”चा नरेश, त्याची मैत्रीण असलेली पत्नी रंजना व मी अनेक वर्षे विद्यार्थी परिषदेचे व सामाजिक काम केले.त्यांच्यामुळे माझ्यासह अनेकांचा स्थानिक पासून राष्ट्रीय नेत्यांपर्यत संपर्क आला होता. महाविद्यालयीन जीवन गाजविणारा व सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेला नरेश गुरुनाथ साखरे हा सर्वांना हवाहवासा कार्यकर्ता आपल्यातून अचानक निघून गेला , ही बाब अतिशय धक्कादायक,मनाला चटका लावणारी व दुःख देणारी आहे.लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असलेल्या नरेश याने विद्यार्थी परिषदेचे अनेक वर्षे सक्रिय राहून कार्य केले, तो अभाविप सोलापूर शाखेचा मंत्री व प्रदेशवर पदाधिकारी होता.तो उत्तम वक्ता होता,लोकांना आपले मत पटवून देण्यात तो अंत्यत तरबेज होता.स्वकुळसाळी समाज,जिव्हेश्वर विद्यार्थी मंच,बेगम पेठ मारुती मंदिर या संस्थांवर त्यांनी पदाधिकारी म्हणून भरीव काम केले आहे.तसेच त्याचा अनेक वर्षे प्रसार माध्यमांशी संपर्क होता.सोलापूर वृत्तदर्शनमध्ये अनेक वर्षे तो व्यवस्थापक होता,त्याने काही काळ वृत्तवाहिन्यासाठी गोवा व पुणे येथे काम केले.सोलापुरातील स्वरांजली चॅनलमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे.अनेकांसाठी जॅनीजिगर असलेला सडेतोड व स्पष्टवक्ता नरेश हा माझ्यासाठी उत्तम मार्गदर्शक व आधारवड होता,त्याच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.त्याचे कर्तृत्व व नेतृत्व हे फार मोठे होते,त्याच्या अकाली निधनाने त्याला श्रद्धांजली वाह्याची म्हटले तर मन शाहरुन सुन्न होते. नियतीचा खेळ अजब असतो,तिथे कुणाचे काय चालत नाही.शेवटी काय तर…..खाली हाथ आया-खाली हाथ गया,उड गया पंछी अकेला प्रिय मित्र नरेशच्या पुण्यातम्याला सदगती मिळो,ही ईश्वरचरणी प्रार्थना व आपण सर्वजण साखरे परिवाराच्या दुःखात सहभागी होऊया.


















