सोलापूर : शहरातील स्थानिक युट्यूब चॅनेल असलेल्या प्राईम महाराष्ट्र या वाहिनीचे संपादक सनाउल्लाह शेख यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी नगरसेवक तौफिक शेख यांचे ते मेव्हणे होतं.
त्यांचे पार्थिव रेल्वे लाईन परिसरातील ताज कंपौंड येथे ठेवण्यात आले असून दुपार दोनच्या नमाजनंतर मोदी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


















