सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना 23 फेब्रुवारी रोजी कोरोनाची लागण झाली उपचारासाठी ते अश्विनी रुग्णालयात दाखल झाले यशस्वी उपचारानंतर त्यांनी कोरोना सारख्या आजारावर मात केली काही दिवस आपल्या निवासस्थानी आराम केल्यानंतर ते शुक्रवार 19 मार्च रोजी जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कर्तव्यावर हजर झाले कोरोनावर मात केल्यानंतर जिल्हा परिषदेतील काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा जंगी सत्कार केला शेवटी नाईलाजाने त्यांनी हा सत्कार स्वीकारला आपल्या कार्यालयात त्यांनी विभाग प्रमुखांची तातडीची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी तात्काळ आंतरराज्य- आंतरजिल्हा प्रवेश करणाऱ्या मार्गावरील चेकपोस्टवर जिल्हा परिषदेचे कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना केल्या या चेकपोस्टवर covid-19 साथीच्या अनुषंगाने जनजागृती करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्यात याव्या दैनंदिन तो अहवाल सादर करावा आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी तांदुळवाडी तामलवाडी तसेच अक्कलकोट तालुक्यातील वागदरी दुधनी मंगळवेढा तालुक्यातील मरवडे सांगोला तालुक्यातील जुनोनी करमाळा तालुक्यातील जातेगाव माळशिरस तालुक्यातील शिंगणापूर नातेपुते माढा तालुक्यातील भिमानगर बार्शी तालुक्यातील डोंगरवाडी या चेक पोस्टवर कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.
याच बरोबर कोरोना प्रतिबंधाच्या कठोर उपाययोजनेसाठी जिल्ह्यात सरपंच व ग्रामसेवकांवर संयुक्तपणे जबाबदारी त्यांनी दिली आहे ग्रामसेवक व स्थानिक कर्मचारी यांनी गावाचा दररोज कोरोना च्या दृष्टीने आढावा घ्यावा ,गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी प्राथमिक शाळेतील शिक्षकांकडून उपलब्ध करून इतर लोकांच्या चाचण्या कराव्यात, संपर्क शोध घेण्याचे काम व्यवस्थित रित्या होत नसेल किंवा प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक करीत नसतील तर त्याचा अहवाल सादर करावा त्यांच्यावर कडक कार्यवाही साथरोग नियंत्रण कायद्याखाली करण्यात येणार आहे. गावात दूधवाले भाजीपाला फळ विक्रेते चक्कीवाले आदींची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे



















