सोलापूर – सोलापूर शहराच्या समातंर पाईपलाईनसाठी रुपये 150-34 कोटीचा निधी मिळावा, होटगी रोडवरील विमानतळावरुन विमानसेवा सुरु करावी, तसेच बोरामणी विमानतळ कामासाठी केंद्राकडून निधी मिळावा,जुळे सोलापूरचा स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करुन नागरी सुविधा द्याव्यात, पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी देशाचे नेते खा. शदर पवार यांच्याकडे माजी आमदार दिलीप माने यांनी निवेदनाद्वारे केली.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले यावेळी त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. तर त्यांना भेटून महत्वाचे विषयावर निवेदन देवून चर्चा केली. सोलापूर शहराच्या नागरीकांसाठी महत्वाची असणारी उजनी – सोलापूर समातंर पाईपलाईनला स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 405 कोटीचे कामास मंजुरी दिली. मात्र या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण परवाना फी रु.42.08 कोटी,पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांच्या जमीनीतील पिकाचे होणारी नुकसान भरपाईसाठी रु. 4.80 याशिवाय मक्तेदारांचे रु.103.46 कोटी असलेली मागणी केलेली रक्क़म याप्रमाणे एकुण रु. 150.34 कोटीचा निधी महानगरपालिकेस शासनाकडून प्राप्त़ करुन देण्याची मागणी केली. तसेच जुळे सोलापूर भागात नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात वाढली असून आवश्यक नागरी सुविधा मिळण्यासाठी या भागाचा स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत समावेश करुन या भागातील नागरीकांना सुविधा देण्याची मागणी करण्यात आली.
होटगी रोडवर असलेल्या विमानतळावरुन विमानसेवा सुरु करण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करुन उद्योजक, व्यापारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वेळ व आर्थिक बचतीसाठी येथुन सद्यस्थितीत विमानसेवा सुरु करावी. तसेच बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खाजगी भुसंपादन झाले आहे. मात्र या क्षेत्रात असलेले वनविभागाची क्षेत्र देण्याचा प्रस्ताव नाकारला आहे.प्रशासनाने पुर्नप्रस्ताव सादर केला असून त्यास केंद्रीय वनमंत्र्याकडून या क्षेत्रासाठी परवानगी व यासाठी असलेला केंद्र शासनाचा निधी उपलब्ध्द करुन देण्याची मागणी केली.
याशिवाय सोलापूर जिल्हयात आजवर 111 टक्के पाऊस झाला असून मागील चार दिवसापुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या 75 हजार हेक्ट़र क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. सद्या पंचनामा सुरु असले तरी तातडीने अहवाल मागवून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार दिलीप माने यांनी केली आहे.


















