उत्तर सोलापूर : हगलूर गावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष अभिजित भडकुंबे, माजी सभापती रजनी भडकुंबे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, निवृत्त शिक्षणाधिकारी शिवशरण, ग्रामपंचायत सदस्य राजकुमार शिंदे, अनिल वाघमारे, श्रीशैल रणधिरे यांची उपस्थिती होती.
यावेळी आपल्या भाषणात दिलीप माने यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 2004 झाली संभाजी भडकुंबे (Sambhaji Bhadkumbe) व मी स्वतः आमदारकीला उभारलो होतो मात्र दोघांचा पराभव झाला जर दोघांपैकी एक जण त्यावेळी उभारले असते तर निश्चित एक जण आमदार झाले असते असे सांगतानाच एक वर्षापूर्वी रजनी भडकुंबे यांच्या सभापतीपदावर अविश्वास ठराव मंजूर झाला मात्र मी एकदा जिद्दीला पेटलो तर मग गप्प बसत नाही शेवटी भडकुंबे यांनी आपला कार्यकाळ अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केला या शब्दात त्यांनी भडकुंबे कुटुंबीयांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या पहा दिलीप माने काय म्हणाले…



















