श्री सिद्धनाथ साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2023-24 चा बॉयलर अग्नीप्रदीपनाचा कार्यक्रम गंगाधर बिराजदार त्यांच्या पत्नी व प्रथमेश पाटील त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सिद्धनाथ कारखान्याचे चेअरमन माजी आमदार दिलीप माने, कारखान्याचे संचालक पृथ्वीराज माने, जयश्री माने, जिल्हा परिषद माजी सदस्य अप्पासाहेब काळे, कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत कुबसंगे, जिल्हा मागास शिक्षण सेवा मंडळाचे संचालक नागेश बिराजदार, सतीश दरेकर, तेलगावचे माजी सरपंच श्रीशैल पाटील, शिवा होसाळे, कारखान्याचे व्यवस्थापिकीय संचालक विनोद पाटील, राम गायकवाड, सचिन गुंड, तोहीद पटेल, नागेश स्वामी आदी उपस्थित होते.