सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते मोहोळ तालुक्यातील अनगरच्या कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्या भाषणात 1999 सालचा किस्सा सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यासाठी मला माझ्या वडिलांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी मुंबईला गेलो आणि सोलापूर जिल्ह्यातून सही करणारा पहिला आमदार मीच होतो असे सांगून अजितदादा यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला… पहा राजन पाटील काय म्हणाले…

















