पुणे : १९७२ दलित पँथर (Dalit Panther) संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ (Padma Shri Namdev Dhasal) यांच्या सोबत २२ वर्ष खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेल्या यशवंत नडगम (Yashwant Nadgam) यांची निवड दलित पँथर पदाधिकारी केंद्रातील व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यंतील तालुका पदाधिकारी यांनी एक मतांनी केंद्रीय अध्यक्षपदी यशवंत नडगम यांची निवड करण्यात आली.
यावेळी पुणे येथे दलित पँथर केंद्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत लोणारी, प्रदेश युवा अध्यक्ष संतोष गायकवाड, मुबई अध्यक्ष प्रताप रावात, सोलापूर जिल्हा अध्यक्ष बंडू दशरथ गवळी तसेच पुणे शहर अध्यक्ष सनी पंजाबी यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून यशवंत नडगम यांचा सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
पुन्हा एकदा पँथर निर्माण करण्यात येणार, तेच ध्येय तेच धोरण अन्यायाला वाचा फोडणार … अशी घोषणाबाजी करण्यात आली.

















