सोलापूर : राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त मानवी साखळी तयार करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ व पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ , सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती शितल बुलबुले, सर्व खाते प्रमुख व पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांनी केले. यावेळी आप्पाराव गायकवाड, कैलास जीदे, अविनाश गायकवाड, भीमाशंकर वाले, बाळासाहेब ममाने, रीमा पवार शकुंतला जाधव आदींनी परिश्रम घेतले.


















