सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याच्या कृषी अधिकारी पदी आर एस माळी हे पूर्णवेळ रुजू झाले आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे तात्पुरता पदभार होता. कृषी विभागाने नुकतीच त्यांची ऑर्डर काढली.
पत्रकारांशी बोलताना माळी म्हणाले, कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा पहिला उद्देश असेल, दक्षिण सोलापूर तालुक्यात हा दोन नद्या असल्याने पाण्याची स्थिती चांगली आहे या भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पाण्याचा वापर अतिरिक्त होतो त्यापेक्षा शेतकऱ्यांनी फळबागांकडे वळण्याची गरज असून यामुळे उत्पन्नाचे हमी आणि पाण्याची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालयाचे काम गतिमान व्हावे यासाठी आपला प्रयत्न आहे.
आर एस माळी हे 1994 पासून शासकीय सेवेत आहेत. सुरुवातीला ग्रामविकास विभागात काम करताना ग्रामसेवक, विस्तार अधिकारी या पदावर त्यांनी काम केले. 1995 पासून त्यांनी कृषी विभागात फलोत्पादन पर्यवेक्षक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक, कृषी अधिकारी, त्यानंतर आता पूर्ण वेळ दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यभार पहात आहेत. तब्बल 27 वर्ष त्यांची सेवा सोलापूर जिल्ह्यात झाली आहे.


















