महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 158 अन्वये जिल्हा परिषदांना 1% मुद्रांक शुल्क अनुदान देय आहे. सन 2009-10 ते सन 2021-22 या वर्षातील जिल्हा परिषद 1% मुद्रांक शुल्क अनुदानापोटी लेखाशिर्ष (3604 0307) आरित, (अनिवार्य) 50- इतर खर्च या उददीष्टाखालील पुरवणी मागणीव्दारे रुपये 72667745/- (अक्षरी सात कोटी सवीस लाख सदूसष्ट लाख सातशे पंचेचाळीस फक्त) इतका निधी सोलापूर जिल्हा परिषदेस मंजूर केलेला आहे. दिनांक 20 मार्च 2023 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेस नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून निधी वितरण आदेश प्राप्त झाला आहे.
यासाठी सीईओ स्वामी यांनी अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार व उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे यांनी याबाबत प्रयत्न केला होता. याबाबत मुद्रांक जिल्हाधकारी गोविंद गीते यांचे मोलाचे सहकार्य झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत पदभार स्विकारल्यापासून या थकित मुद्रांक शुल्क अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. आज या पाठपूराव्यास यश प्राप्त होवून सात कोटी एवढा निधी सोलापूर जिल्हा परिषदेस प्राप्त झाला आहे.
अजयसिंह पवार
मुख्य लेखा व वित्त अधिकारी


















