उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 सप्टेंबर रोजी दोन वर्षाच्या बालकाला पेंटा व्हॅलेंटची लस देण्यात आली होती या लसीकरणानंतर त्या बाळाचा काही दिवसानंतर मृत्यू झाला आरोग्य सेविकेच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची तक्रार आली या प्रकरणी नातेवाइकांनी आंदोलन केल्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची नातेवाईकांनी भेट घेतल्यानंतर संबंधित आरोग्यसेविकेवर कारवाई करण्याची मागणी झाली यावर प्रशासनाने चौकशी समिती नेमून अभिप्राय दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आरोग्य सेविकेस निलंबित केले तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात खरे तर निष्काळजीपणा झाल्याबद्दल संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यावर कारवाई योग्य आहे मात्र इतक्या दिवसानंतर हा विषय ऐरणीवर आला, एका जिल्हा परिषद सदस्या सह आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी सीईओ स्वामी यांची भेट घेतली, झेेडपी सदस्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी दोषी असून त्यावरही कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान झालेल्या हलगर्जीपणा बद्दल संबंधित सेविकेने माफी मागितली, कारवाई मागे घेण्याची विनंती झाली, सीईओ स्वामींनी खुलासा मागितला, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता स्वामी या प्रकरणात कारवाई मागे पण घेतील, सध्या तिऱ्हे पीएचसीचा विषय गाजत आहे, तक्रारी येत आहेत, यावर कायमचा तोडगा आवश्यक आहे, अधिकाऱ्यांना काढलेल्या कारणे दाखवा नोटीसला काही अर्थ नाही, नावाला या नोटिसा असतात , आरोग्य सेविकेवरील कारवाई सुद्धा आज ना उद्या मागे घेतली गेली असती पण त्या डोणगावातील गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबातील एका बाळाचा मृत्यू झाला, मसलखांब कुटुंबीय अनेक वेळा जिल्हा परिषदेत येऊन गेले, घटना दुर्दैवी होती पण त्या कुटुंबाला झेडपीने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे, तशी फाईल डॉ भीमाशंकर जमादार असताना तयार होत होती पण त्यांची बदली झाली, नवे डीएचओ जाधव आल्यावर ती फाईल दफ्तरी राहिली, काही वर्षांपूर्वी MR व्हॅक्सीनेशन सुरू असताना असेच एका बालकाचा मृत्यू झाला होता, तेव्हा मृत्यूची कारणे वेगवेगळी सांगण्यात आली मात्र जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून त्यावेळचे तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी 3 लाखाची आर्थिक मदत मृताच्या कुटुंबियांना दिली होती. अशा प्रकारे जर मदत देता येत असेल तर निश्चित प्रयत्न व्हावा अन त्या बालकाला न्याय मिळावा.