सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त हरीश बैजल ना आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीसाठी दोन टॉप व दोन बेसला परवानगी द्या त्यांच्या आनंदावर विरजण आणू नका अशा सूचना दिलेल्या आहेत. काही वेळापूर्वी पत्रकार नितीन पात्रे यांनी पालकमंत्री भरणे यांच्याशी संवाद साधला त्यामध्येही पालकमंत्र्यांनी पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले आहे ते निर्णय घेतील असे सांगितले मात्र अद्याप ही पोलिस आयुक्तांनी अधिकृतपणे कोणताही निर्णय घेतलेला नाही.
शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव विश्वस्त समिती आणि मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे पोलीस आयुक्तांनी निर्णय न घेतल्यास 30 एप्रिलपर्यंत जयंती उत्सव सुरू ठेवू असे असा इशारा विश्वस्त समितीने दिला आहे तर मध्यवर्ती महामंडळाने सोलापूर बंदची हाक दिली आहे. दरम्यान सोलापूर शहरातील सोशल मीडियावर पोलीस आयुक्तांनी डोल्बी लावण्यास परवानगी दिली असे मेसेज फिरत असल्याची चर्चा आहे मात्र अधिकृतपणे हरीश बैजल यांनी तसा कोणताही आदेश काढलेला नाही मात्र शुक्रवारी रात्रीपर्यंत याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

















