सोलापूर : सिद्धेश्वर देवस्थान आयोजित श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचा दुसरा दिवस भव्य अशा डॉग शोने रंगला. एक नाय दोन नाय सत्तावीस प्रकारच्या कुत्र्यांनी या डॉग शोमध्ये रंगत आणली. तब्बल 72 जणांनी या शोमध्ये सहभाग नोंदवला
डॉग शो पाहण्यासाठी देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, पुष्कराज काडादी, हे आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. यावेळी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, निवृत्त कृषी अधिकारी विजयकुमार बरबडे, कृषी प्रदर्शन समिती प्रमुख गुरुराज माळगे यांची उपस्थिती होती. डॉ सत्यजित पाटील व स्वप्नाली चालुक्य यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
या डॉग शो मध्ये देशी विदेशी गोल्डन रिट्रीव्हर, डाबरमॅन, पॉमेरियन, सायबेरीयन हस्की, रॉट वेलर, लॉब्रीडोर, टॉयपॉम, बिगल्स, रेट्रीवर, जर्मन शेफर्ड, डॅशहाउंड, पिटबुल, कारवन हाउन, हस्की अशी तब्बल 27 प्रकारच्या कुत्र्यांनी सहभाग नोंदवला. सुमारे 1 लाखपासून ते 10 हजार रुपये पर्यंत किमतीचे कुत्रे यावेळी पहायला मिळाले.
या स्पर्धेत रितेश कट्टे, बालाजी मदने , सिद्धार्थ काशीद, रितेश कट्टे, स्वप्नील सुलाते, राहुल जाधव, तनिष्का रत्नपारखी, विशाल राठोड, शिवकुमार शिंदे, विशाल अक्कलवाडी, व्यंकटेश शिंदे यांच्या कुत्र्यांनी बक्षीस जिंकली.



















