राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे आणि माळशिरस चे नेते उत्तमराव जानकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळत या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल द्यावा असा आदेश दिला आहे अशी माहिती पत्रकारांना दिली त्यामुळे आता मोहिते-पाटील गटाचे शितलदेवी मोहिते, स्वरुपाराणी मोहिते, गणेश पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे, सुनंदा फुले या सहा सदस्यांचे सदस्य पद रद्द होईल अशी चर्चा जिल्हा परिषदेत घुमु लागली ही बातमी जिल्हा परिषदेत समजताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी फटाके बाजी केली अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला सहा सदस्यांमध्ये अरुण तोडकर व गणेश कांबळे हे जिल्हा परिषदेमध्ये होते दरम्यान याप्रकरणी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांना पत्रकारांनी विचारले असता आपणास काहीही माहित नाही संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलेन अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली यानंतर माजी पक्ष नेते आनंद तानवडे जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील अध्यक्ष कांबळे यांचे सहकारी मित्र अजित तळेकर हे सदस्यांच्या बसण्याच्या ठिकाणी चर्चा करताना दिसून आले पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली मात्र त्यांनी दिली नाही, दरम्यान भाजपचे सदस्य आनंद तानवडे यांच्या कडून असे समजले की अध्यक्ष निवडीवेळी माळशिरस च्या त्या सहा सदस्यांनी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवाराला मतदान केले त्याच्या विरोधात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली िल्हाधिकार्यांनी यावर निकाल द्यायला वेळ केला त्यामुळे माळशिरसवाले उच्च न्यायालयात गेले , उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली या निकालाविरोधात माळशिरस च्या सहा सदस्यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली ही पण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे आणि यामध्ये जिल्हाधिकार्यांनी यावर निकाल द्यावा असे आदेश दिले आहेत या प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिला नाही उच्च न्यायालयाने निकाल दिला नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा प्रथम न्यायालय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले आहे िल्हाधिकार्यांनी निकाल दिल्यानंतर परत या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जाता येणार आहे अशी माहिती भाजपच्या सदस्यांकडून कळाली त्यामुळे याप्रकरणात निकालच नाहीतर अविश्वास ठरावाचा प्रश्नच येत नाही अनिरुद्ध कांबळे हे आपला कार्यकाळ पूर्ण करतील , सहा सदस्यांचा कार्यकाळ असाच निघून जाईल असा दावा आनंद तानवडे यांनी केलाय.