राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्याची मागील पंधरा दिवसांपासून सोलापुरात एका चर्चा सुरू आहे, या दौऱ्यामध्ये ते शासकीय विश्रामगृहावर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार असून शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांचा स्वतंत्र मेळावा घेणार आहेत मात्र या दौऱ्यामध्ये नगरसेवक तोफिक शेख नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रवेशाची चर्चा आहे परंतु सर्वाधिक चर्चा ही महेश कोठे यांच्या निवासस्थानी जाण्याची आहे दरम्यान बुधवारी सायंकाळी त्यांचा दौरा कार्यक्रम आला असून दिवसभरात कोणकोणते कार्यक्रम आहेत ते पहा



















