लातूरच्या उपायुक्त वीणा ज्ञानेश्वर पवार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा सह आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी या पदाचा 1 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यभार स्वीकारला.
वीणा पवार या 18 एप्रिल 2022 पासून उपायुक्त लातूर महानगरपालिका येथे कार्यरत होत्या, त्यांच्या विनंती बदलीच्या अर्जावर विचार होऊन त्यांना नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई ,यांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा सह आयुक्त तथा जिल्हा प्रशासन अधिकारी या रिक्त पदावर बदलीने पदस्थापना देण्यात आलेली आहे. सदर पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार पवार यांना देण्यात आला आहे.
वीणा पवार या M .Sc (Agriculture ) असून त्यांचे B. Sc (Agri ) शेतकी (Agriculture college) महाविद्यालय कोल्हापूर येथे झालेले आहे व M.sc (Agri) हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झालेले आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने व बिकट परिस्थितीवर मात करून वडिलांच्या निधनानंतर वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी MPSC चा अभ्यास करून सेल्फ स्टडी करून तसेच कृषीमित्र एकता मंच या त्यांच्या संघटनेच्या मदतीने व त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी MPSC या स्पर्धा परीक्षेची तयारी 2005 ते 2009 या कालावधीत केली व प्रथम 2009 साली त्यांची विक्रीकर निरीक्षक या पदावर निवड झाली. त्यानंतर त्यांची निवड २०१० साली मुख्याधिकारी गट ब या पदावर झाली. मुख्याधिकारी गट ब या पदावर असताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगरपालिका, कुर्डूवाडी नगरपालिका, करमाळा नगरपालिका, उस्मानाबाद जिल्हातील मुरूम नगरपालिका या चार नगरपालिकेमध्ये तसेच वैराग नगरपंचायत येथे आपली सेवा दिलेली आहे.
त्यांचे एप्रिल 2022 ला वर्ग अ पदावर पदोन्नती होऊन लातूर उपयुक्त या पदावर त्यांची पदस्थापना झाली होती. लातूर येथे देखील त्यांनी दीड वर्ष सेवा केल्यानंतर त्यांची विनंती बदली च्या अर्जावर विचार होवून त्यांची सोलापूर जिल्ह्यामध्ये सह आयुक्त या पदावर बदली करण्यात आलेली आहे.