Sunday, February 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हा परिषद युनियनचा सर्वधर्मीय स्नेह कायम ; दिवाळीत वाढवला असा गोडवा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 November 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिवाळी सण व त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीतील सर्व धर्मातील  सण हे स्नेह, आनंद, आपुलकी व एकमेकाविषयी काळजी घेणारे सण असून त्याच अनुषंगाने आज जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने घेतलेला हा सर्व धर्मीय स्नेह फराळ कार्यक्रम हे त्याचे प्रतीक आहे असे प्रतिपादन जिल्हा कोषागार अधिकारी सर्फराज मोमीन यांनी  मेळाव्याचे उद्घाटन करताना प्रतिपादन केले. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना ईशादिन शेळकंदे यांनी गोड फराळ दीपावली सणाचा आनंदाचा व समृद्धीचे प्रतीक असून त्यामध्ये सर्वांना सामावून घेऊन केल्याने तो वृद्धिंगत होऊन दिवाळी सण हा सर्वांचा आहे अशी भावना या कार्यक्रमातून दिसून येते. 

या प्रसंगी कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे व विस्तार अधिकारी आरोग्य महेबूब निटोरे यांनी आपल्या भावना  व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सालाबादप्रमाणे  सर्वधर्मीय प्रामुख्याने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्मीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळ स्नेह मेळाव्याचे दिप प्रज्वलित करून यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते.

 या प्रसंगी उपकोषागार अधिकारी वसीम बागवान, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर , लेखा कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष उमाकांत राजगुरू, बहुजन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अप्पाराव गायकवाड, आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव समीर शेख, वाहन चालक संघटनेचे सचिव शहानवाज शेख, मैलमजूर संघटनेचे जाफर शेख,कोषागार संघटनेचे श्रीकांत होसमनी उपस्थित होते. 

या कार्यक्रमात कोषागार अधिकारी व त्यांच्या सहकारी यांनी दिवाळी सणानिमित्त सण अग्रीम व वेतन तातडीने केल्याबद्दल युनियनच्या वतीने मोमीन, बागवान,  होसमनी यांचा सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तजमुल मुतवली, सूत्रसंचालन डॉ. एस. पी. माने तर आभार प्रदर्शन समीर शेख यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे ,निर्मला राठोड , रीमा पवार आरती माढेकर,सविता काळे,अश्विनी दोरकर, स्वाती स्वामी,श्रीशैल देशमुख , बसवराज दिंडोरे,विलास मसलकर ,संतोष शिंदे ,राकेश सोडी, विशाल घोगरे, चेतन भोसले ,शांताबाई जाधव , सुवर्णा  कोरके ,श्रीमती बनसोडे, सिद्धमा म्हेत्रे, वर्षा औधूर्ती, आदींनी परिश्रम घेतले. 

सर्व कर्मचाऱ्यांना ताटा भोवती रंगीत रांगोळी ,  दिप,आकाश कंदील अशा दिवाळीच्या प्रतीकासोबत फराळाचे आस्वाद देण्यात आले. सदरचा कार्यक्रम करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे यांचे ‘नो प्लास्टिक’ संकल्पनेचे पूर्णतः पालन महिला कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले. 

आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व महिलांनी स्वतः  घरी तयार केलेले फराळ या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिल्याने कार्यक्रमाचा गोडवा  अधिक वाढला. कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील वरील धर्मीय कर्मचारी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

गुरुनानक चौक परिसरातील पोस्ट ऑफिस मध्ये होतेय नागरिकांची तारांबळ ; काय आहे कारण

Next Post

जीव देऊत, पण जमीन देणार नाही-बाधित शेतकऱ्यांचा आक्रोश ; ग्रीनफिल्ड हायवेचा वाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जीव देऊत, पण जमीन देणार नाही-बाधित शेतकऱ्यांचा आक्रोश ; ग्रीनफिल्ड हायवेचा वाद

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970672
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group