सोलापूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या महिला शाखेच्या पदाधिकाऱ्यांचे गठन राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, विभागीय संघटक डॉ. एस. पी. माने, जिल्हाध्यक्ष तजमुल मुत्तवली, सचिव विलास मसलकर, सल्लागार श्रीशैल देशमुख, विशाल घोगरे, संतोष शिंदे, राकेश सोडी, राजीव गाडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
ही बैठक मृणालिनी शिंदे व अंगणवाडी पर्यवेक्षिका अध्यक्षा माधवी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. महिला कर्मचाऱ्यांच्या स्वतंत्र समस्या व महिला कर्मचाऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद मध्ये महिला कर्मचारी युनियनची संघटन व निवड एकमताने करण्यात आली. विवेक लिंगराज यांनी मान्यता देऊन या निवडी जाहीर करण्यात आल्या .या निवडीनंतर राज्याध्यक्ष बलराज मगर, कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांनी अभिनंदन केले. महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण झाल्याने सर्व महिला कर्मचाऱ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केला आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी चांगले काम करण्याची भूमिका या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खालील प्रमाणे महिला कार्यकरणी व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली करण्यात आली. अध्यक्ष अनुपमा पडवळे, कनिष्ट प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग जि.प.सोलापुर, सचिव निर्मला राठोड वरिष्ट सहाय्यक पंचायत समिती दक्षिण सोलापुर, कार्याध्यक्ष स्वाती स्वामी विस्तार अधिकारी (शिक्षण) शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.सोलापूर कार्याध्यक्ष, सोनाली कदम शाखा अभियंता ग्रामीण पाणि पुरवठा जि.प.सोलापूर उपाध्यक्ष, सविता काळे परिचर आरोग्य विभाग जि.प.सोलापुर उपाध्यक्ष, आरती माढेकर कनिष्ट सहाय्यक शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.सोलापूर सहसचिव, अंबिका वाघमोडे, कनिष्ट लेखा अधिकारी शिक्षण विभाग (प्राथ) जि.प.सोलापूर कोषाध्यक्ष, मृणाली शिंदे विस्तार अधिकारी (सांख्याकी) पंचायत समिती अक्कलकोट मुख्य संघटक, राजश्री कांगरे कनिष्ट सहाय्यक कृषी विभाग जि.प.सोलापुर प्रसिध्दी प्रमुख, ज्योती लामकाने कनिष्ट सहाय्यक पंचायत समिती उत्तर सोलापुर प्रसिध्दी प्रमुख, कार्यकरणी सदस्य, संगीता सुलगडले, सहाय्यक प्रशासन अधिकारी कृषी विभाग जि.प.सोलापुर, ज्योती काटकर स्टेनो सा.प्र.वि-1 जि.प.सोलापूर, अश्विनी सातपुते, कनिष्ट लेखा अधिकारी अर्थ विभाग जि.प.सोलापुर, पुनम नरसोडे विस्तार अधिकारी (सांख्याकी) पंचायत समिती दक्षिण सोलापुर, अंजु पाटील, वरिष्ट सहाय्यक (लेखा) अर्थ विभाग जि.प.सोलापुर, फरजाना शेख वरिष्ट सहाय्यक बांधकाम क्र 1, रेणूका प्रथमशेट्टी, कनिष्ट सहाय्यक ग्रामीण पाणि पुरवठा जि.प.सोलापूर, सुचिता जाधव कनिष्ट सहाय्यक बांधकाम क्र 2, शशिकला सुतार, कनिष्ट सहाय्यक, समाजकल्याण विभाग, सविता मिसाळ परिचर ल.पा.विभाग जि.प.सोलापूर, अश्विनी दोरकर परिचर बांधकाम क्र 1

















