सोलापुर जिल्हयामध्ये जिल्हा नियोजन समिती निधीच्या वितरणावरुन जिल्ह्यातील आमदार व नियोजन समितीचे सदस्य असलेल्या 27 जिल्हा परिषद सदस्य यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपाअभावी प्रलंबीत आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये जिल्हा परिषदेचे सत्तावीस सदस्य आहेत. कायद्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचा निधी हा खर्च करण्याचा १०० टक्के अधिकार हा जिल्हा परिषदेस आहे.
परंतु या जिल्हयामध्ये पुर्वी जिल्हा नियोजन समिती मध्ये ३५ टक्के निधी पालकमंत्री, आमदार व खासदार यांना तर ६५ टक्के निधी जिल्हा परिषदेचे सदस्य या प्रमाणे निधी वितरीत होत होता. परंतु आमदार महोदयांच्या वादामुळे सदर निधी प्रशासकीय मान्यते अभावी पडुन राहिलेला आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आमदार महोदयांच्या दबावामुळे निर्णय घेत नाहीत. तरी याबाबत योग्य त्या सुचना आपले स्तरावरुन पालकमंत्री भरणे यांना देणेत याव्यात. अशी मागणी करण्यात आली आहे, हे पत्र जिल्हा परिषद सदस्य नितीन नकाते यांनी शरद पवारांना दिले आहे.


















