सोलापूर : तब्बल दीड महिन्याच्या मसूरी येथील प्रशासकीय ट्रेनिंग नंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे शनिवारी सोलापुरात आगमन झाले. प्रशासकीय दृष्ट्या मार्च एंड अतिशय महत्त्वाचा समजला जातो. त्या अनुषंगाने त्यांनी खर्चाचा आढावा घेण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांची तातडीची बैठक शनिवारी बोलावली होती. योग असा होता की 25 मार्च हा स्वामी यांचा वाढदिवस.
सीईओ स्वामी हे जिल्हा परिषदेत आल्याचे कळताच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रांग लागल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी त्यांचे जिल्हा परिषदेत स्वागत करत वाढदिवसानिमित्त सत्कार केला.
त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे, महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सानिया बागडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्या टीमने स्वामी यांचा सत्कार केला. पाणी व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सचिन जाधव यांच्या उपस्थितीत सत्कार केला.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये इव्हेंट मॅनेजर म्हणून ओळख निर्माण झालेल्या दक्षिण पंचायत समिती येथील प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांनी आपल्या संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आवारात वृक्षारोपण करून तसेच जरीचा फेटा घालत भला मोठा हार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपला विवेक धर्म पाळत आपली हौस भागवली.




























