सोलापूर – जिल्हा परिषदेच्या आपल्या पंधरा महिन्यांच्या कार्यकाळात तब्बल पंधरापेक्षा अधिक विविध उपक्रम व नवनव्या संकल्पना राबवून सोलापूर जिल्हा परिषदेला महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देणारे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा शुक्रवार 25 मार्च रोजी वाढदिवस.
जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम तसेच वह्या वाटप करून वाढदिवस साजरा तर झालाच मात्र जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. संपूर्ण जिल्हा आणि राज्यभरातून त्यांना शुभेच्छा संदेश आले. यावरून विविध अभियाने राबवून ग्रामीण भागातील जनमानसात मानाचे स्थान सिईओ दिलीप स्वामी यांनी पटकाविले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे वाढदिवसा निमित्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सभागृहात सत्कार केला. त्यानंतर इशाधिन शेळकंदे यांचे हस्ते सत्कार करणेत आला. माझी वसुंधरा अभियानाच्या धर्तीवर फुलाचे झाड देऊन सिईओ सरांचा यथोचित गौरव केला.
त्यांच्या निवास्थानी सकाळच्या सुमारास मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, स्वीय सहाय्यक मल्लिकार्जुन तळवार व कार्यालयीन टीम, उद्योजक प्रल्हाद काशीद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे, लघु पाटबंधारेचे प्रभारी कार्यकारी अभियंता पंडित भोसले, उपअभियंता चौगुले यांनी शुभेच्छा दिल्या.
सिईओ स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे पाथुर्डी ता. करमाळा येथे निसर्ग प्रेमी ग्रामसेवक एम एन काळे यांनी ग्रामस्थांसोबत केशर आंब्याची झाड लावून वाढदिवस साजरा करण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शितल जाधव व त्यांचे सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या. आरोग्य कर्मचारी संघटनेचे वतीने महेश जाधव यांनी तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख तसेच जिल्हा कोषागार अधिकारी रूपाली कोळी, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, लेखाधिकारी कैलास कुंभार यांनी वृक्ष देऊन सत्कार केला.
जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाते वतीने कार्यकारी अभियंता दिपक कोळी , उप अभियंता सुनील कटकधोंड, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे यांनी तसेच विविध कर्मचारी संघटनेचे वतीने स्वागत केले.
कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्यावतीने चंद्रकांत होळकर यांच्यासह त्यांच्या टीमने शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे वतीने जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव व त्यांचे सहकारी यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, कर्मचारी संघटनेचे गिरीष जाधव यांनी स्वागत केले.
वह्या देऊन सत्कार
भेटणेसाठी आलेल्या अभ्यागतांनी वह्या देऊन सिईओ स्वामी यांचा सत्कार केला. आज पर्यंत दहा हजार वह्या जमा झाले आहेत तरी यामधील गरीब विद्यार्थ्यांनी वह्याचे वाटप करणेत आले आहे. अक्कलकोट तालुक्यांतील संगोळगी येथील विद्यालयात वह्या वाटप करणेत आले.


























