कुमठा नाका परिसरात सोलापूर जिल्हा क्रीडा संकुल आहे याठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालय आहे मात्र क्रीडा संकुलाची एकूणच परिस्थिती पाहता अतिशय वाईट चित्र पाहायला मिळतं या क्रीडासंकुलात कोणत्याही सुविधा नाहीत, गाळे धारकांना स्वच्छता गृह नाही, सुरक्षा रक्षक नाही, पाण्याची सोय नाही, दिवाबत्ती नाही, रस्ते खराब आहेत, त्यामुळे दरवर्षी येणारा विकास निधी जातो कुठे असा प्रश्न तिथली परिस्थिती पाहिल्यावर पडतो याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी अचानकपणे जिल्हा क्रीडा संकुलला भेट दिली, जिल्हाधिकारी शंभरकर हे आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली जिल्हा क्रीडाअधिकारी नितीन तारळकर यांच्या कार्यालयात काही वेळ थांबल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आपला ताफा रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यापारी गाड्यांकडे वळवला या गाळयाची चौकशी केली ,अनेक गाळे बेकायदेशीर पद्धतीने दिल्याचे चित्र त्यांना निदर्शनास आलं एका छोट्याशा पोलीस चौकीला तब्बल तीन गाळे देण्यात आले आहेत तसेच काही गाळे बंद अवस्थेत त्यांना पाहायला मिळाले, गाळे वाटपाचा सविस्तर अहवाल तयार करून सादर करण्याच्या सूचना देतानाच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या एकूणच बोगस कारभारावर संताप व्यक्त करत ते ऑफिसकडे रवाना झाले.
सोलापूरचा ढाण्या वाघ आता ठाण्यात गाजणार ; ॲड. अमित आळंगे यांची….
सोलापूरचा ढाण्या वाघ आता ठाण्यात गाजणार ; ॲड. अमित आळंगे यांची.... येथील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अमित आळंगे यांची ठाण्याच्या...