सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेला मोबाईल टॉवर प्रशासनाला “प्रचंड डोकेदुखी” झाल्याचं चित्र होतं. कुणी पण येतंय अन् टॉवर वर चढून आंदोलन करतंय, प्रसिद्धी मिळवण्यासाठी शोले चित्रपटातील ही स्टंटबाजी झाली होती. निश्चितच प्रशासन दरबारी काम होत नसल्याने काही नागरिक वैतागून असे मार्ग अवलंबतात पण काही केवळ प्रसिद्धीच्या स्टंटबाजी साठी हा मार्ग अवलंबला जातो, याची डोकेदुखी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाला होती.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने या मोबाईल टॉवर वर चढता येऊ नये म्हणून सर्व बाजूचे रस्ते बंद केले, तारेची जाळी बसवली, एक गेट करून त्याला कुलूप घातले, तरीही गेटचे कुलूप तोडून काही शेतकरी वर चढून आंदोलन करत प्रशासनाला वेठीस धरले होते, त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा टॉवर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी हा टॉवर काढण्यास सुरुवात झाली आहे

















