सोलापूर, दि. 9 (जिमाका ):- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत संपूर्ण देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रण ची शपथ दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार महसूल दत्तात्रय मोहोळे, तहसीलदार पुनर्वसन अमोल कुंभार, एन आय सी चे उत्कर्ष होनकळसे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळा आज दिनांक 9 ऑगस्ट पासून सुरू झालेला आहे. त्यानिमित्त मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत पंचप्रण शपथ आयोजित करण्यात आलेली आहे. आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू, अशी शपथ अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली.
माझी माती माझा देश या उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयात पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता आयोजित करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्देश देण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयानी त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ देण्याचा उपक्रम त्यांच्या कार्यालयात आयोजित केलेला होता.
*******