सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये सध्या एक इमारत अशी आहे की, त्या इमारतीच्या तिन्ही मजल्यावर असलेल्या कार्यालयातील विभाग प्रमुख हे प्रभारी आहेत. खालच्या मजल्यावर प्राथमिक शिक्षण विभाग तिथे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्याकडे शिक्षणाधिकाऱ्याचा पदभार आहे. त्यांना आता मजेशीर असे ‘जाबीर पाशा’ म्हटले जाते.
एकदम वरच्या मजल्यावर माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय भास्कर बाबर यांची बदली झाल्याने उपशिक्षणाधिकारी पदावरून प्रमोशन मिळालेल्या निरंतर शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांच्याकडे तात्पुरता चार्ज आहे.
शासनाने शिक्षण विभागाच्या सर्व योजना आता एकाच अधिकाऱ्याकडे देऊन स्वतंत्र कार्यालय दिले आहे. त्यामुळे वटारे यांच्याकडे प्राथमिक, माध्यमिक, अल्पसंख्याक यासह केंद्राच्या सर्व योजनांचे काम त्या पाहणार आहेत.
वटारे या दोन महिने झाले शिक्षणाधिकारी योजना चा पदभार घेऊन पण अद्यापही प्राथमिक शिक्षण विभागाच्या योजना त्यांच्याकडे वर्ग करण्यात आल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत शिक्षणाधिकारी वटारे यांनी जावीर यांना तसे पत्र ही दिल्याचे समजते. अद्याप ही योजना वर्ग केल्या नसल्याने प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर आता संशय व्यक्त होत आहे. योजना वर्ग न करण्यामागचा अर्थ काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
■ प्राथमिक कडे असलेल्या योजना
1.सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना
2.प्राथमिक शाळेतील पुस्तक पेढी योजना
3.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष सुविधा (मोफत गणवेश व साहित्य पुरवठा)
4.राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या १०३ विकास गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके
5.राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या १२० विकास गटातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या मोफत गणवेश व लेखनसाहित्य पुरवठा
6.इयत्ता पहिली ते चौथीमधील प्राथमिक शाळेत शिकणा-या मुलींना उपस्थिती भत्ता
7.शालेय पोषण आहार योजना
8.राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
9.जिल्हा बालभवन योजना


















