सोलापूर : महामानव, बोधिसत्व, भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादनासाठी जनसागर लोटला ‘जय-भीम’च्या जयघोषात या भारतरत्नाला अभिवादन करताना भिम अनुयायी महामानवाच्या चरणी नतमस्तक झाले.
यंदा भीमजयंतीचा अभूतपूर्व उत्साह दिसून आहे. सकाळी नऊ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, महापालिका आयुक्त शीतल उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले, जात पडताळणी समितीच्या सहाय्यक आयुक्त छाया गाडेकर, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, शशी कांबळे, उत्सव अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.
महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व विश्वस्त समितीचे सदस्य राजा सरवदे, उत्सव अध्यक्ष शिवम सोनकांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेत अभिवादन केले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत जात वैधता प्रमाणपत्र पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक विनोद भोसले, बसवराज म्हेत्रे, हाजीमलंग नदाफ, मधुकर आठवले, हेमा चिंचोळकर, संध्याताई काळे, प्रमिला तूपलवंडे, नागनाथ कदम, एन के क्षीरसागर, उमेश सुरते यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरुवातीला आमदार सुभाष देशमुख यांनी येऊन अभिवादन केले. माजी मंत्री दिलीप कांबळे, खासदार स्वामी महाराज, आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री लक्षमणराव ढोबळे, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी महापौर श्रीकांचना यंनम, श्रीनिवास करली, सुभाष शेजवाळ, वंदना गायकवाड, इंदिरा कुडक्याल, राजाभाऊ माने यांच्या उपस्थितीत अभिवादन झाले.
शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, विजय पुकाळे यांच्या उपस्थितीत अभिवादन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष भारत जाधव, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, शशिकला कसपटे, नलिनी चंदेले, यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या मतीन बागवान, राम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून सामाजिक समतेचा संदेश देत अभिवादन झाले.
यावेळी विविध मान्यवरांनी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत ही जयंती शांततेत सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन केले. पोलिस प्रशासनाच्या वतीने पार्क चौकामध्ये सर्वत्र बंदोबस्त तैनात होता शांततेत सर्वांनी अभिवादन करावे यासाठी पोलीस प्रयत्न करत होते.


























