मोहोळ तालुक्यातील मौजे टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत. या निवडणुकीच्या संदर्भात भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 27 जून रोजी पार पडली.
यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भात शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून भीमा साखर कारखाना निवडणूक लढविण्याचा एकमुखी निर्णय सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
तरी इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दिनांक 28 जून रोजी दहा वाजता पाटकुल येथे शिवाजी महाराज चौकात एसटी स्टँडच्या च्या जवळ उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे चंद्रकांत निकम, जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, प्रशांत पाटील, बाळासाहेब सपाटे, महेश बिस्किटे, सिताराम रणदिवे यांनी केले आहे.
तसेच बैठकीमध्ये प्रभाकर देशमुख यांनी सर्वांना विश्वासात घेऊन भीमा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व पक्ष व संघटनाना सोबत घेऊन भीमा कारखान्याची निवडणूक आपण पार पडायची असा निर्धार केला.

















