सोलापूर : कॉलनीतील मुलांना मारहाण करण्याच्या उद्देशाने फायबर काठी घेऊन निघालेल्या दोघा जणांना मुलांना असे का मारता असे विचारल्याच्या कारणावरून चिडलेल्या दोघा जणांनी दोन भावंडाना जबर मारहाण केली. हा प्रकार जुळे सोलापुरातील रेणुका नगरात शुक्रवारी रात्री घडला.
या मारहाणीच्या घटनेतील जखमींना त्या जोडगोळीने तुला चौकीत नेऊन दाखवतो मी कोण आहे, असे म्हणत जणू खाकीचा रोब दाखविला असल्याचे या घटनेतून पुढे आलं आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,
बॉम्बे पार्क रेणुका नगरातील रहिवासी अनुषा प्रदीप शिंदे आणि त्याचा भाऊ शुक्रवारी रात्री जेवणानंतर शतपावली करीत होते. त्यावेळी एम.एच. १३ सीके ३००१ चा चालक व त्याचा साथीदार हाती फायबर स्टीक घेऊन कॉलनीतील मुलांकडे मारण्यासाठी जात असल्याचे उभयतांना दिसले.
त्यावेळी अनुषा शिंदे याने कारमधून उतरलेला चालक आणि त्याचा साथीदार विनाकारण कॉलनीतील पोरांच्या पाठीमागे फायबर काठीने मारण्यासाठी जात असल्याचे पाहिले. त्यावेळी अनुशा शिंदे याने, ‘काका, तुम्ही त्यांना का मारता’, असे विचारणा केली असता, त्या चालकाने, तू लहान आहेस, तुला काही कळत नाही, तु गप्प बस’ असे, म्हणून त्याच्या हातातील फायबर काठीने शिंदे याच्या दोन्ही पायाच्या मांडीवर पाठीमागील बाजूस मारल्याने, त्यास मुक्का मार लागला. अनुशा शिंदे या मारहाणीनंतर घरी जात असताना , वरील दोघांनी मोटार सायकलवरुन दुसऱ्या साथीदारास घेऊन येऊन प्रतिक कुलकर्णी यांना, तुला पोलीस चौकीत घेऊन जातो अन् मी काय आहे, तुला दाखवितो असे दमदाटी केली.
त्यामुळे सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे काय, असा सवाल जनमानसातून विचारला जातोय. याप्रकरणी अनुष्का शिंदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी अनुषाचा भाऊ आदित्य यालाही मारहाण केली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

















