सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांच्या कार्याविषयी कवी राघवन यांचा नऊ अध्याय असलेला सुमारे ४० पानांचा ग्रंथ हिरेहब्बू वाड्यात एका सागवानी पेटीमध्ये पूजेसाठी ठेवण्यात आला होता. गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास चोरट्यांनी वाड्यात प्रवेश करुन हा ग्रंथ तसेच पितळी दिवा, तांबा धातूच्या तांब्या असा ऐवज पळवून नेला.
शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास सागर हिरेहब्बू हे पूजा करीत असताना चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती हिरेहब्बू यांनी फौजदार चावडी पोलिसांना दिली होती.
त्यामुळे पोलिसांनी अग्निशामक दलाला बोलवून स्कुबा डायव्हींग करणाऱ्या इसमांकडून हे ग्रंथ पाण्यामध्ये शोध कार्य सुरू आहे परंतु ग्रंथ काही सापडत नाहीत असे चित्र पहायला मिळाले. आमदार विजय देशमुख, राजशेखर हिरेहब्बू हे त्या घटनास्थळावर बराच वेळ थांबून होते.
* ग्रंथ एवढा महत्वाचा का आहे
११४० ला कवी राघवाक यांनी श्री सिद्धेश्वर महाराज यांचे आत्मचरित्र कच्चकन्नड भाषेत लिहिले. हा ग्रंथ ५० पानांचा असून यामध्ये नऊ अध्याय आहेत. या अध्यायामध्ये श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या नोंदी घेतल्या आहेत. त्याकाळी या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढली होती असे सांगण्यात आले.

















