सोलापूर – विडी कामगारांना शासन निर्णय नुसार लागू किमान वेतन फरकासह मिळाले याकरिता लाल बावटा विडी कामगार संघटनेच्या वतीने सहा.कामगार आयुक्त कार्यालय यांच्याकडे 1690 दावे 2017 दाखल केले. यावर गेली चार वर्षे सुनावणी चालू असून अद्यापही याचा निकाल लागत नाही. याबद्धल ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर वारंवार निवेदन,चर्चा करूनही दावे प्रलंबित ठेवले. आज गुरुवार दिनांक 6 जुलै रोजी सहा.कामगार आयुक्त कार्यालय येथे सुनावणी दुपारी 2 वाजता ठेवण्यात आली.
तब्बल चार तास विलंब होऊन ही सहा.कामगार आयुक्त कार्यालय येथे न आल्याने विडी कामगार आक्रमक होऊन कार्यालयात ठिय्या मांडले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यानंतर सिटू चे राज्य उपाध्यक्ष कॉ.युसूफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली विडी कामगारांचे शिष्टमंडळ सहा.कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना भेटून म्हणणे सादर केले.यावेळी साधक बाधक चर्चा झाली.सदर दाखल केलेले दावे एक महिन्याच्या आत निकाली काढणार असून पुढील सुनावणी सोमवार 10 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सहा.कामगार आयुक्त कार्यालय येथे घेणार असल्याचे सहा.कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांनी बैठकीत सांगितले. त्यानंतर विडी कामगार कार्यालयाचा ताबा सोडले.
यावेळी सिटू चे राज्य उपाध्यक्ष कॉ.युसूफ शेख मेजर, अँड.नसीर माशाळवाले,विल्यम ससाणे,बापु साबळे,वसीम मुल्ला,अँड अनिल वासम आदींची प्रमुख उपस्थिती होती. गीता चिलवेरी, नसरीन शेख, मल्लिकार्जुन मुळे, दिनेश बडगू, अरुण सामल ,अकील पटेल बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.




















