सोलापूर – “ चला जाणूया नदीला “अभियान अंतर्गत सोलापूर जिल्ह्यासाठी टास्क फोर्स ची स्थापना करणेत आली आहे. या साठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी नियुक्ती करणेत आली आहे. येत्या १ मे पासून या कामास सुरूवात करणेत येणार आहे.
जिल्हा परिषदेचा यशवंतराव चव्हाण सभागृहात आज “चला जाणूया नदीला” या अभियान अंतर्गत आज सोलापूर जिल्ह्यातील ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले आहे. या बैठकीस मार्गदर्शन करताना सिईओ दिलीप स्वामी बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, राज्य समन्वय समितीचे सदस्य सुमंत पांडे, सदस्य महेंद्र महाजन, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, भुजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भुवैज्ञानिक मुश्ताक शेख , सहाय्यक गटविकास अधिकारी डी एम पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अभियान व्यवस्थापक सचिन चवरे प्रमुख उपस्थित होते.
कासाळगंगा प्रकल्पा अंतर्गत कासाळगंगा नदीचे पुनर्जिवन तयार करणेत आले आहे. सोलापूर जिल्ह्सात कासळगंगा च्या धर्तीवर जिल्हातील नद्या वाहत्या करणे साठी तसेच कासा गंगा प्रकल्पाचे धर्तीवर माण नदीचे पुनर्जिवन करणेत येत आहे. असेही राज्य समन्वय समितीचे सदस्य सुमंत पांडे यांनी सांगितले.
भीमा नदी हा आपला प्राण – सिईओ दिलीप स्वामी
चंद्रभागा नदी आपला प्राण आहे. नद्यांना जाणून घ्यायचे म्हणजे नदी कुणी पाहिली नाही का ? असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, प्राचीन संस्कृती नदीकाठी वसलेली आहे. नंदीचे प्रदुषण रोखणे सर्वांची जबाबदारी आहे. चंद्रभागा परिक्रमा करून जनजागृती करणेत आली आहे. माझी वसुंधरा अंतर्गत एक बैठक वसुंधरेसाठी घेणेत आली आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
नदीकाठच्या सर्व ग्रामपंचायतीसाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
सोलापूर जिल्ह्यात सर्व नदीकाठच्या गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणेत येत आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत या ग्रामपंचायतींना ७० टक्के निधी उपलब्ध करून देणेत येत आहेत. नद्या मध्ये सांडपाणी सोडू नये. घनकचरा मध्ये जनावरांचे मलमुत्र जाऊ नये. या गावात प्लास्टीक व्यवस्थापन व्हावे. या पाठीमागचा उद्देश्य आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
नदीकाठच्या ग्रामपंचायती साठीचा कृतीआराखडा- शेळकंदे
नदीकाठच्या गावांचा कृतीआराखडा तयार करणेत येत आहे. टास्कफोर्स समितीचे माध्यमातून कामांची प्रभावी अंमलबजावणी करणेत येत आहे. पंधरावा वित्त आयोग व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चा संयोगिकरण करणेत येत आहे. या गावात सर्व कुटुंबाला शौचालये, सार्वजनिक शौचालय व सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे आराखडे करणेत येत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.
शासकीय योजनांचे कृतीसंगम करा – सुमंत पांडे
जलयुक्त शिवार टप्पा २, सामाजिक वनिकरन, जलसंपदा, जलसंधारण विभाग, ग्रामविकास व कृषी विभाग, या विभागाची अतंर्गत कृतीसंगम करून मध्यम मुदतीचे व दिर्घ मुदतीचे कामांते नियोजन करणेचे सुचना सुमंत पांडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
कसागंगा प्रकल्प त्याच्या अंतर्गत 23 गावे व वाड्यावरचे येतात यामध्ये महिला बचत गटाची संख्या 397 इतके या बचत गटामधील महिलांचा वृक्ष लागवडीसाठी रोपे तयार करणे प्रक्रिया उद्योगासह मार्केटिंग मध्ये सहभाग घेऊन रोजगार निर्मितीला चलना देणे सहज शक्य असल्याचे राज्य कार्यकारी सदस्य महेंद्र महाजन यांनी बोलताना सांगितले.


















