सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची सोलापूरातच सामान्य प्रशासन विभागाच्या डेप्युटी सीईओ पदी नियुक्ती झाली, त्यांच्या जागेवर नाशिक जिल्हा परिषदेचे इशाधीन शेळकंदे यांची नियुक्ती करण्यात आली. 13 ऑगस्ट रोजी शेळकंदे यांनी ग्रामपंचायत विभागाच्या डेप्युटी सीईओ पदाचा पदभार घेतला.
पत्रकारांनी भेट घेऊन संवाद साधला असता त्यांनी सोलापूर जिल्हा हा मोठा आहे, हजारावर ग्रामपंचायत आहेत, या विभागाचा ग्रामीण भागाशी थेट संबंध असतो, ग्रामपंचायत विभागाच्या विविध योजना चांगल्या पद्धतीने राबविण्या बरोबर सर्व जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय साधून अतिशय पारदर्शक पणे कामकाज होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
शेळकंदे हे सुरुवातीला पंढरपूर पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाले, त्यावेळी पंढरपूर तालुका हा चार विधानसभा मतदारसंघात विभागला गेल्याने व्याप मोठा होता, चार-पाच आमदारांसोबत संपर्क आला त्यामुळे तिथे कामाचा अनुभव दांडगा होता तोच इतर ठिकाणी काम आल्याचे ते सांगतात. पंढरपूर नंतर
शेळकंदे यांनी राहुरी गटविकास अधिकारी म्हणून काम केले पुढे नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते त्याठिकाणी स्वच्छ भारत सर्व्हेक्षण या मोहिमेत नाशिक जिल्हा प्रथम क्रमांक पटकावला होता असे शेळकंदे यांनी सांगितले.


















